EPFO : जाणून घ्या ऐन मार्चमध्ये 'ईपीएफओ'चा काय आला आहे नवीन आदेश



ब्युरो टीम : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या पात्र सदस्यांना अधिक पेन्शन पर्याय निवडण्याची आणखी एक वाढीव संधी दिली आहे. या अंतर्गत, ईपीएफओचे पात्र सदस्य वाढीव पेन्शन मिळविण्यासाठी आता ३ मे २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.

ईपीएफओने १३ मार्च २०२३ रोजी एक परिपत्रक जारी करत कर्मचारी पेन्शन योजना (जीपीएस) अंतर्गत जास्त पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांसाठी, यापूर्वी त्याची अंतिम मुदत ३ मार्च होती, जी आता आणखी वाढवण्यात आली आहे. कर्मचारी पेन्शन योजना, १९९५ (EPS ९५) अंतर्गत, पात्र पेन्शनधारक आता जास्त निवृत्ती वेतनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३ मे पर्यंत अर्ज करू शकतात.

कामगार मंत्रालयाने सोमवारी एका निवेदन जारी केले आणि म्हटले की आता कामगार/नियोक्ता संघटना, अध्यक्षांच्या मागणीनुसार, केंद्रीय विश्वस्त मंडळाने अशा कामगारांकडून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३ मे २०२३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने याबाबत एक ट्विटही केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने