EPFO : गुड न्यूज! पीएफवर मिळणाऱ्या व्याजदारात वाढ



ब्युरो टीम : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (ईपीएफओ) आपल्या सहा कोटी खातेदारांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफओने ईपीएफमधील ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आता पीएफ खातेदारांना ८.१५ टक्के व्याजदर मिळणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (सीबीटी) बैठकीत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीटी ही ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे आणि केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव याचे अध्यक्ष आहेत. EPF व्याजदरात वाढ झाल्यामुळे सुमारे ६ कोटी सक्रिय ग्राहकांना फायदा होणार असून यापैकी ७२.७३ लाख हे आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पेन्शनधारक होते.

दरम्यान, एखाद्या कर्मचाऱ्याच्या पगारातून १२% कपात केलेली रक्कम ईपीएफ खात्यात कम केली जाते. कर्मचार्‍यांच्या पगारातून नियोक्त्याने केलेल्या कपातीपैकी ८.३३% रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) पर्यंत पोहोचते, तर ३.६७% EPF मध्ये जमा केली जाते. दरम्यान, तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अॅप, वेबसाइट किंवा तुमच्या मोबाइल फोनवरून एसएमएस पाठवून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. सध्याच्या काळात देशभरात सुमारे ६.५ कोटी कर्मचारी ईपीएफओ सदस्य आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने