Fox : कोल्हा आला रे आला.. वाचा कुठे घडला प्रकार?



ब्युरो टीम : अहमदनगर शहराच्या काही अंतरावर असणाऱ्या बाराबाभळी येथील महेश नगर येथे नागरीवस्तीत राहत्या घराच्या कंपाउंडमध्ये पाणी व खाद्याच्या शोधामध्ये कोल्हा आला.  हा कोल्हा पाहून तेथील नागरिकांनी सर्पमित्र कृष्णा बेरड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मोठ्या कौशल्याने सदर कोल्हा धरला, व निसर्गात मुक्त केला.

नागरीवस्तीत कोल्हा पाहून तेथील उपस्थित नागरिकांच्या मनात धडकी भरली होती. पण शेवटी कोल्हा पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेच्या श्वास सोडला, व सर्पमित्र कृष्णा बेरड पाटील यांनी वन अधिकारी वनपाल सचिन शहाणे, वनरक्षक अर्जुन खेडकर, वन कर्मचारी पी.एन बनसोडे, ए.के साठे, अमोल गायकवाड यांनी कोल्हाची निसर्गात मुक्तता केली.  

दरम्यान, यावर्षी कोल्हाची वाढ झाली असून प्राणी हे पाणी व खाद्याच्या शोधामध्ये कोठेही आढळून येणार असून दिसल्यास त्यांना मारू नये, असे आवाहन कृष्णा बेरड यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने