FRINJEX-2023 : येथे होणार भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव



ब्युरो टीम : केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पानगोडे लष्करी तळावर येत्या ७ आणि ८ मार्च रोजी भारतीय आणि फ्रेंच लष्करा दरम्यान 'फ्रिंजेक्स-23' हा पहिला संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जाईल. तिरुअनंतपुरम स्थित भारतीय सैन्य दल आणि फ्रेंच ६ व्या लाइट आर्मर्ड ब्रिगेडमधील पलटणीचा समावेश असलेली तुकडी या स्वरूपामध्ये दोन्ही देशांचे सैन्य प्रथमच सहभागी होत आहे. रक्षा मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली.

दोन्ही सैन्यांमधील आंतर-कार्यक्षमता, समन्वय आणि सामरिक पातळीवर सहकार्य वाढवणे, हे या सरावाचे उद्दिष्ट आहे. संयुक्त मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण, अंतर्गत विस्थापित लोकसंख्या (IDP) शिबिराची स्थापना आणि आपत्ती निवारण सामग्रीचे वहन करण्याकरिता संकल्पित क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी संयुक्त कमांड पोस्टची स्थापना आणि कार्यान्वयन करण्यासाठीही हा सराव होत आहे.

या संयुक्त सरावामुळे फ्रान्ससोबत संरक्षण सहकार्य अधिक दृढ होईल, जे एकूणच भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीचा एक महत्त्वाचा पैलू आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने