G 20 : 'कामगार 20' ची 'येथे' होणार बैठक, 20 राष्ट्रांचे प्रतिनिधी झाले सहभागी



ब्युरो टीम : जगातील अव्वल  विकसित आणि विकसनशील राष्ट्रांचा  जागतिक समूह असलेल्या जी 20 चा एक प्रमुख प्रतिबद्धता गट असलेल्या कामगार 20 (एल 20) च्या पहिल्या बैठकीसाठी 20 देशांतील ट्रेड  युनियन प्रतिनिधीतज्ज्ञ आणि कामगार नेते याशिवाय भारतातील ट्रेड युनियनचे नेते आणि कामगार तज्ज्ञ  पंजाबमधील अमृतसर येथे  दाखल होत आहेत.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव आणि पंजाबचे मुख्यमंत्री  भगवंत मान एल 20 च्या प्रारंभिक  बैठकीत प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.

2023 मधील जी 20 चे भारताचे अध्यक्षपद हा महत्वाच्या  जागतिक मुद्द्यांवर  जगासोबत सहकार्याचा एक महत्वाचा प्रयत्न आहे.

भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना असलेला भारतीय मजदूर संघ कामगार  कामगार 20 प्रतिबद्धता गटाच्या बैठकीचे आयोजन करत आहे आणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  हिरण्मय पंड्या एल 20 चे अध्यक्ष असतील. ते शहरातील प्रारंभिक बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. भारतातील इतर अनेक आघाडीच्या कामगार संघटनाही या बैठकीत सहभागी  होणार आहेत.

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष   हिरण्मय पंड्या यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या एल 20 बैठकीचा तपशील सांगितला.या प्रारंभिक बैठकित सामाजिक सुरक्षिततेच्या सार्वत्रिकीकरणासहकामगारांचे आंतरराष्ट्रीय स्थलांतर: सामाजिक सुरक्षा निधीची पोर्टेबिलिटीअसंघटीत कामगारांसाठी सामाजिक संरक्षणआणि कौशल्य प्रशिक्षण आणि कौशल्य सुधारणा : नियोक्ताकर्मचारी आणि सरकार यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या या मुख्य शाश्वत उपजीविका आणि रोजगाराशी संबंधित विषयांवर चर्चा करण्याचे नियोजन आहेअसे त्यांनी सांगितले. 

जागतिक स्तरावर कामगारांच्या स्थिती संदर्भातील  काही नवीन कल म्हणजेच कामाचे  बदलते  जग: जी -20 देशांमध्ये रोजगाराच्या नवीन संधीशाश्वत साजेशा  कामाला  प्रोत्साहन;  वेतनासंदर्भात देशांमधील  अनुभवांची देवाणघेवाणतसेच  महिला आणि कामाचे भविष्य या विषयांवर देखील  पुढील दोन दिवस चालणाऱ्या एल 20 च्या प्रारंभिक बैठकीत लक्ष केंद्रित केले जाईल.

प्रा. संतोष मेहरोत्राडॉ. प्रवीण सिन्हाप्रा. रवी श्रीवास्तवअधिवक्ता सी. के. साजी नारायणनतामिळनाडूच्या बी.आर. आंबेडकर विधी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एन. संतोष कुमार,  आणि बिलासपूर विद्यापीठाचे प्रा. ए. डी. एन. वाजपेयी हे कामगार संदर्भातील  सुप्रसिद्ध तज्ञ यात सहभागी होतील आणि ही  चर्चा समृद्ध करतील. निवडक मित्र देशांव्यतिरिक्त विविध जी 20 राष्ट्रे आणि संघटनांचे कामगार तज्ञ आणि कामगार संघटना नेते वरील विषयांवर चर्चा करतील.

जी 20:  वीस देशांचा हा समूह आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा प्रमुख मंच आहे. हा मंच  सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय आर्थिक मुद्द्यांवर जागतिक रचनात्मक चौकट  आणि प्रशासनाला आकार देण्यात आणि बळकट  करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो . 2023 मध्ये भारत  जी 20 चे  अध्यक्षपद भूषवत आहे.

एल 20: कामगार 20 हा जी 20 च्या 11 प्रतिबद्धता गटांपैकी एक आहे,   गैर-सरकारी प्रयत्नांच्या माध्यमातून या गटाचे नेतृत्व  केले जाते. एल 20 जागतिक स्तरावरील कामगारांचे अलीकडील कल अधोरेखित करत कामगार आणि रोजगाराच्या चिंता आणि समस्यांवर चर्चा करतो. 

भारतीय मजदूर संघ : भारतीय मजदूर संघ ही भारतातील सर्वात मोठी केंद्रीय कामगार संघटना आहे आणि 11 गटांपैकी एक असलेल्या कामगार 20 (एल 20) प्रतिबद्धता गटाची अध्यक्ष आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने