Girish Bapat : संघ स्वयंसेवक ते खासदार, गिरीश बापटांचा राजकीय प्रवास



ब्युरो टीम : भाजपचे पुणे येथील खासदार माननीय गिरीजी बापट यांचे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. आपल्या जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते खासदार असा त्यांचा प्रवास हा थक्क करणारा होता. 

गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास

गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट 1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. यावेळी त्यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी अनेकदा लढा दिला होता. ते मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. जनसंघापासूनच त्यांच्या राजकीय कारर्कीद सुरूवात झाली. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट 1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेच्या मोहन जोशी यांचा पराभव करत त्यांनी लोकसभा गाठली होती. या निवडणुकीत त्यांनी जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. आणीबाणीमध्ये त्यांनी 19 महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये भोगला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने