Girish Bapat : दुःखद बातमी! भाजप नेते गिरीश बापट यांचे निधन



ब्युरो टीम : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, कसब्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे आज, २९ मार्च रोजी दुखद निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी होते. मात्र, कालपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 

गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असून गेली अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. मात्र,गेल्या काही वर्षांपासून गिरीश बापट यांना दुर्धर आजाराची लागण झाल्यामुळे ते राजकारणापासून दूर होते. त्यांचा मतदारसंघातील वावर जवळपास संपला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप पक्ष अडचणीत सापडला असताना गिरीश बापट यांनी आजारपण बाजुला सारून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. या मेळाव्याला येतानाही गिरीश बापट यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता. या परिस्थितीमध्येही गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यात चैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला होता. या मेळाव्यात गिरीश बापट यांना बोलताना प्रचंड धाप लागत होती. परंतु, इच्छाशक्तीच्या बळावर गिरीश बापट यांनी त्यांची कामगिरी फत्ते केली होती. या मेळाव्यानंतरही गिरीश बापट यांनी प्रकृती काहीशी खालावल्याची चर्चा होती. बापट इतके आजारी असतानाही भाजपने त्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवल्यामुळे अनेकांनी टीकाही केली होती. कसबा पोटनिवडणुकीच्या काळात भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे गिरीश बापट यांच्या पुण्यातील घरी गेले होते. यावेळी अमित शाह आणि गिरीश बापट यांनी गप्पा मारल्या होत्या. दोन्ही नेत्यांनी या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने