Girish Bapat :अखेरचा निरोप! गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार



ब्युरो टीम : भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गिरीश बापट यांना अखेरचा निरोप देताना पुण्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांना, तसंच उपस्थित असलेल्या नेत्यांना अश्रू अनावर झाले होते. गिरीश बापट यांचे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या पुण्यातल्या शनिवार पेठ या ठिकाणी असलेल्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. या वेळी अंत्यदर्शनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अंकुश काकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचेही नेते उपस्थित होते. स्थानिक भाजपाचे कार्यकर्तेसह सर्वपक्षीय नेते असे सगळेच गिरीश बापट यांना अखेरचा निरोप देण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमीत पोहचले होते. अंत्ययात्रेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह प्रमुख दिग्गज भाजपा नेत्यांचाही सहभाग होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने