Global Millets : येथे सुरू आहे जागतिक भरडधान्य परिषद



ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली शेतकी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास महामंडळ (APEDA), भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांनी जागतिक भरडधान्य म्हणजेच श्रीअन्न परिषद आयोजित केली आहे.

भारतातून भरड धान्यांची निर्यात आणि त्यासाठी उत्पादकांची बाजारपेठेशी संलग्नता या संदर्भात नवी दिल्लीत पुसा येथे सुब्रमण्यम हॉलएन ए एस सी कॉम्प्लेक्सआय ए आर आय कॅम्पस येथे ही परिषद भरली आहे. या परिषदेसाठी देशाच्या विविध भागातून 100 भारतीय भरडधान्य प्रदर्शक आणि अमेरिकायुनायटेड अरब अमिरातकुवेत जर्मनीव्हिएतनामजपानकेनियामालावीभूतानइटली आणि मलेशिया यासारख्या देशातून जवळपास 100 आंतरराष्ट्रीय विक्रेते या परिषदेला आमंत्रित केले आहेत.

परिषदेतील सहभागींना व्यापार आणि व्यापार संबंधी नेटवर्किंग याच्या उत्तमोत्तम संधी या परिषदेतून मिळत आहेत. मिलेट आयात करू शकतील अशा 30 संभाव्य देशांनी त्यांच्याकडील प्रमुख खरेदीदार या परिषदेला तसेच प्रदर्शनाला भेट देण्यासाठी पाठवावेत आणि भरड धान्याच्या विशिष्ट उत्पादनांच्या प्रदर्शन करणाऱ्या 100 स्टॉल्स ना भेट द्यावीअसे विनंती अपेडाने केली आहे. याशिवाय सर्व मिलेट प्रदर्शकांची सविस्तर माहिती वेगवेगळ्या श्रेणी अंतर्गत प्रदर्शन भागात लावली आहे. त्यातून  भरड धान्याचा स्रोत आयातदार भारतीय भरडधान्य उत्पादकांच्या या यादीमधून डिजिटली शोधू शकतात.

वर्चुअल ट्रेड फेअर हे वर्षभर 24X7 सुरू असेल यामध्ये प्रदर्शक आणि विक्रेते त्या प्रदर्शनात मांडलेल्या उत्पादनांच्या बाबतीत एकमेकांशी संवाद साधू  शकतील.

वर्ष 2019-22 मध्ये भारताची भरड धान्य निर्यात ही 64 दशलक्ष USD एवढी होती. आता एप्रिल ते डिसेंबर 2023 मध्ये गेल्यावर्षीच्या याच कालावधीतील निर्यातीच्या तुलनेत भरड धान्य निर्यातीत 12.5% ने वाढ झाली आहे.

गेल्या दशकभरात भरड धान्यांच्या निर्यातीत मोठा लक्षणीय  फरक पडल्याचे दिसून येते. अमेरिका ऑस्ट्रेलिया इत्यादींसारख्या 2011 12 ला महत्त्वाचे आयातदार असणाऱ्या देशांऐवजी नेपाळ (6.09 दशलक्ष अमेरिकन डॉलर),  युनायटेड अरब अमिराती ( 4.84 दशलक्ष अमेरिकन डॉलर) आणि सौदी अरेबिया ( 3.84 दशलक्ष अमेरिकन डॉलर) या 2019-22 मधे प्रमुख आयातदार देश होते. गेल्या दशकभरात महत्त्वाच्या संभाव्य आयातदारांपैकी पाकिस्तान आणि केनियाही सुद्धा महत्त्वाची नावे होती. भारताच्या मिलेट निर्यातदारांपैकी महत्त्वाचे देश म्हणजे लिबियाट्युनिशियामोरक्कोब्रिटन येमेनओमान  आणि अल्जेरिया. जगभरातील एकूण 149 देशांना भारत भरड धान्य निर्यात करतो. लवकरच भारताच्या बहुमूल्य उत्पादनांची निर्यात जगभरात येऊ लागेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने