Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याला गुढीची पूजा कशी कराल? वाचा एका क्लिकवर



ब्युरो टीम : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारण्यात येते. पण या गुढीची पूजा कशी करावी, हे अनेकांना माहिती नसते. चला तर आज आम्ही तुम्हाला गुढी पूजा बाबत महत्त्वाची माहिती देणार आहोत.

अशी करा गुढी पाडव्याला पूजा

हिंदू धर्माचं नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा उद्या, 22 मार्च रोजी साजरा होत आहे. या दिवशी गुढीची पूजा कशी करावी? याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. सर्वात प्रथम वेळूची काठी स्वच्छ धूवा. त्यानंतर  त्या काठीवर साडी आणि ब्लाऊज पीस दोरीच्या साह्याने बांधा. आंब्याची पानं आणि कडुलिंब बांधा. साखरेची माळ आणि फुलांचा हार घाला.कलशावर पाच हळदीकुंकाचे बोट लावा. स्वास्तिक काढा. आता हे कलश काठीवर पालथ घाला. ही गुढी पाट किंवा चौरंगावर उभी घराच्या मुख्य दाराजवळ उभी करा.

हे करणे ठरले फायद्याचे!

शुभ मुहूर्तावर उठून स्नान करुन देवाची विधीवत पूजा करा.  ज्या पाट किंवा चौरंगावर गुढी उभारणार त्यावर पांढरा कपडा नक्की टाका. त्यावर हळदीकुंकाने अष्टकोनी कमळ बनवा. कमळाच्या मध्यभागी ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवून पूजा करा. गणपतीची आराधना करताना ‘ओम ब्रह्मणे नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या दिवशी कडुलिंबाच्या पानाची पावडर बनवून मीठ, हिंग, जिरे, काळी मिरी आणि साखर घालून सेवन करा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने