विक्रम बनकर, नगर : आज महाराष्ट्रभर गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येत आहे. साईबाबांच्या शिर्डीत गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा उत्साह आहे. साई मंदिराच्या कळसावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली आहे. साई संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून गुढी उभारली.
सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत वर्षभरातील प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्याची परंपरा आहे. आज मराठी नववर्षाचे स्वागतही मोठ्या उत्साहात पार पडत आहे. आज साईबाबांच्या मुर्तीला कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह साखरेच्या गाठीची माळा परिधान करण्यात आली. साईदर्शनाने नववर्षाची सुरूवात करण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.
गुढीपाडव्या निमित्त श्री साईबाबा समाधी मंदिराच्या कळसावर परंपरेनुसार गुढी उभारण्यात आली. यावेळी गुढीची विधिवत पूजा संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांच्या पत्नी मालती यार्लगड्डा यांनी केले. याप्रसंगी संस्थानचे प्र.प्रशासकीय अधिकारी संजय जोरी, सुरक्षा अधिकारी आण्णासाहेब परेदशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी व शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.
पहा व्हिडीओ
टिप्पणी पोस्ट करा