Gudi Padwa Shubh Muhurat : उद्या गुढीपाडवा, जाणून घ्या शुभ मुहूर्त



ब्युरो टीम : हिंदू धर्माचं नवं वर्ष म्हणजे गुढी पाडवा. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला म्हणजेच यंदा 22 मार्च 2023 ला साजरा गुढीपाडवा साजरा करण्यात येत आहे. तर यादिवशीचा शुभ मुहूर्त, पूजा विधी, साहित्य आणि गुढी नेमकी कोणत्या दिशेला उभारावीत, हे जाणून घेयुयात.

काय आहे गुढी उभारण्याचा मुहूर्त

चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा प्रारंभ  21 मार्च रात्री 09.22 पासून सुरू होत असून  समाप्ती  22 मार्चला संध्याकाळी 06.50 ला आहे. उदय तिथी नुसार 22 मार्च 2023 बुधवारला गुढी पाडवा साजरी होणार आहे. गुढी पाडवा पूजा मुहूर्त 22 मार्चला सकाळी 06.29  ते सकाळी 07.39 आहे.

गुढी उभा करण्यासाठी लागणारे साहित्य

गुढी उभारण्यासाठी वेळूची काठी, कडुलिंबाचा पानं, आंब्याची पानं, दोन तांब्याचे कलश, काठापदराची साडी, ब्लाऊज पीस, साखरेचा हार, खोबऱ्याचा हार, लाल कलरचा धागा, चौरंग किंवा पाठ, फुलांचा हार हे साहित्य लागेल.

गुढी पूजेसाठी लागणारे साहित्य 

गुढी पूजेसाठी कलश, हळद, कुंकू, तांदूळ, पाणी, पंचामृत, साखर, पिवळे चंदन, अक्षदा, थोडीशी फुलं, आरती, कापूर, अगरबत्ती किंवा धूप, लक्ष्मी मातेची नाणी, सुपारी, पानं सुपारी हे साहित्य आवश्यक आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने