Gudi Padwa : गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात?



ब्युरो टीम : हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 22 एप्रिल 2023 ला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभुषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या, देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, महाभारतामध्येही गुढीपाडव्याचा उल्लेख आहे. 

महाभारतामध्ये आदिपर्वात उपरिचर राजाला इंद्राने दिलेली कळकाची काठी त्यानं इंद्राच्या सन्मामार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नववर्षाच्या निमित्तानं तिची पूजा केली. या परंपरेचं अनुकरण आणि सन्मान म्हणून इतर राजांनीही गुढीच्या काठीला रेशीमचे वस्र लावून, तिचा शृंगार करुन आणि तिच्यावर पुष्पमाला बांधून तिचं पूजन करु लागले. तेव्हापासून ही प्रथा पडली. हीच परंपरा कायम ठेऊन गुढीपाडवा साजरा केला जातो अशी देखील मान्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने