H3N2 Virus : मोठी बातमी! इन्फ्लुएन्झाचा महाराष्ट्रातील पहिला मृत्यू नगरमध्ये!



ब्युरो टीम : एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाचा (विषाणूज्वर) महाराष्ट्रातील पहिला मृत्यू नगरमध्ये झाल्याचे सरकारी वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला 23 वर्षीय तरुण नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. गत आठवड्यात तो ट्रीपसाठी कोकणात गेला होता.

तेथून आल्यानंतर तो आजारी पडला. त्याची कोवीड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात रविवारी उपचारासाठी दाखल केले. तेथील तपासणीत कोवीड 19 सोबतच एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू होते.  मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, हरियाणा आणि कर्नाटक राज्यात दोन बळी गेल्यानंतर महाराष्ट्रात एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाचा पहिला व देशातील तिसरा बळी या विषाणूने घेतला. कोरोना लाटेतही राज्यात नगर हॉटस्पॉट ठरले होते. आता एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा या नव्या विषाणूचा राज्यातील पहिला बळी नगरला गेल्याने नगरकरांना सर्तकता राहण्याची आवाहन करण्यात आलंय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने