H3N2 Virus : इन्फ्लुएन्झाने रुग्णाचा मृत्यू होताच प्रशासन अलर्ट, यासाठी आयोजित केली डॉक्टरांची बैठक



विक्रम बनकर, नगर : एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाचा (विषाणूज्वर) महाराष्ट्रातील पहिला मृत्यू नगरमध्ये झाल्याने येथील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. या पार्श्वभूमी अहमदनगर महानगरपालिकेने तातडीने महापालिका हद्दीतीत सर्व हॉस्पिटल, वैद्यकीय व्यावसायिक यांची बैठक आयोजित केलीय. महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

नगरमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झने मृत्यू झाला.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेला 23 वर्षीय तरुण नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. गत आठवड्यात तो ट्रीपसाठी अलिबाग येथे गेला होता. या घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा हादरली असून त्यांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. याबाबत आयुक्त जावळे म्हणाले,' सदरचा रुग्ण हा 12 तारखेला नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा 13 मार्चला मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्याने अलिबाग येथून प्रवास केला. त्यानंतर त्याला सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसू लागली. स्थानिक रुग्णालयात उपचार घेऊन तो अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. शहरातील सर्व हॉस्पिटलची बैठक आयोजित केली आहे. तसेच रुग्णालयांना सूचना दिले आहेत की, जर आपल्याकडे असे लक्षणे असणारी रुग्ण तपासणीसाठी आल्यास त्यांची कोविड प्रोटोकॉल नुसार तपासणी करा व त्याबाबतची माहिती महापालिकेत द्या.'

पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने