H3N2 Virus : इन्फ्लुएन्झाने मृत्यू झालेल्या 'त्या' रुग्णाचा संपर्कात आलेल्यांचं काय झालं? डॉक्टर म्हणाले...



विक्रम बनकर, नगर :  राज्यात करोनाच्या जीवघेण्या संसर्गाचा धोका कमी झाल्यानंतर आता कुठे सर्व काही सुरळीत सुरू आहे. अशात आता ऐका नव्या व्हायरसमुळे राज्याची चिंता वाढली आहे. इन्फ्लुएंझा (H3N2)ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढत असतानाच  नगरमध्ये याचा पहिला बळी गेला आहे.  मात्र आता या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बाबत एक महत्त्वाची माहिती अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली आहे.

डॉ. घोगरे यांनी सांगितले की,  'एच3 एन 2 इन्फ्लुएन्झची लागण झालेल्या एका तरुणाचा अहमदनगरमध्ये मृत्यू झाला. वैद्यकीय महाविद्यालयात हा तरुण शिक्षण घेत होता. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. वसतिगृहातील सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या कोणालाही संसर्ग आढळून आला नाही. सुमारे ६६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. लक्षणे दिसून आल्यास लगेच तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे.'

पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने