Happy Holi : मानाच्या होळीने राज्यातील प्रसिद्ध मढीच्या यात्रेला सुरुवात



ब्युरो टीम : भटक्यांची पंढरी असलेल्या तालुक्यातील मढी येथील यात्रेला आज  कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या  कळसाला टेकवून व  गोपाळ समाजाची होळी पेटवून सुरवात करण्यात आली.   हा उत्सव शांततेत पार पडला..

 आज सकाळी कैकाडी समाजाचे मानकरी नारायण बाबा जाधव यांच्या हस्ते मंदिराच्या कळसाला मानाची काठी टेकवून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड,विश्वस्त अर्जुन शिरसाठ,संजय मरकड,रवी आरोळे व अभय  आव्हाड हे उपस्थित होते. तर सायंकाळी गोपाळ समाजाची होळी पेटवण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड यांनी होळी पेटवणाऱ्या  मानकऱ्यांना गोवऱ्या दिल्या. या वेळी भाऊसाहेब मरकड,शामराव मरकड,डॉ. विलास मरकड,नवनाथ मरकड,विठ्ठल राजळे हे उपस्थित होते. या नंतर वाजत गाजत या गोवऱ्या मंदिराच्या पायथ्याला आणण्यात आल्या. 'कानिफनाथ की जय' अशा घोषणा देत  मानकऱ्यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने गोपाळ बांधव उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने