Health : 'या' जिल्ह्यात एचआयव्ही एड्स बाबत कलापथकाद्वारे जागृती, कारण...



विक्रम बनकर (प्रतिनिधी, नगर) : अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही व एड्स बाबत कलपथकाद्वारे जनजागृती  करण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाची सुरुवात माळीवाडा बस स्थानक येथून या  करण्यात आली. त्यानंतर भिस्तबाग चौक, सह्याद्री चौक एम.आय.डी.सी.या परिसरात एच.आय. व्ही./ एड्स गुप्तरोग प्रतिबंधक उपचार नियंत्रण जनजागृती अभियान कार्यक्रम घेण्यात आला. 

एच.आय.व्ही विषयी असलेली भीती, एड्स ची स्थिती, एच.आय.व्ही. होण्याची कारणे, त्याची लक्षणे व त्यावर उपचार पद्धती आणि उपाययोजना  विषयी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच यावेळी 1097 हा मोफत टोल फ्री क्रमांक व नाको ॲप बाबत माहिती देण्यात आली.  कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कार्यक्रम आधिकरी शिवाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लोकांना आवाहन करण्यात आले की, 'एच.आय.व्ही. गुप्त रोगाची लक्षणे आढळल्यास जिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन तपासणी करून घ्यावी. यावेळी या विभागातील कर्मचारी पाटोळे, लोखंडे, काळे, फुलारी, कुलकर्णी, शेख, सर्व सुरक्षा केंद्र त्याच प्रमाणे अमृतदीप प्रकल्प व्यवस्थापक शुभांगी माने, सागर विटकर, प्रसाद माळी आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. दरम्यान, आता उपक्रमाच्या पुढील टप्प्यात राहुरी फॅक्टरी, श्रीरामपूर नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड या भागात विविध ठिकाणी कलापथकाचे कार्यक्रम घेऊन एच.आय.व्ही. बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने