Health : तुमच्या शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत तर नाही ना?



ब्युरो टीम : कोलेस्टेरॉल ही आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. ही एक प्रकारची चरबी आहे, जी चिकट मेणासारखी असते. कोलेस्टेरॉलमुळे शरीरात अनेक हार्मोन आणि पेशी तयार होतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटलं की, जर कोलेस्टेरॉल शरीरात राहिलं नाही, तर आपण जास्त काळ जगू शकत नाही. शरीराची अशी काही लक्षणं आहेत, ज्यामुळे तुम्हाला अंदाज लावता येतो की, तुम्हाला कोलेस्टेरॉलचा अटॅक येण्याचा धोका आहे किंवा नाही? चला तर ही लक्षणं कोणती आहेत, ते जाणून घेऊ.

नखे खराब होतात : जेव्हा रक्तामध्ये जास्त कोलेस्टेरॉल जमा होऊ लागतं, तेव्हा ते रक्तवाहिन्यांचा विस्तार करते. त्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात रक्त पोहोचत नाही. नखेही खराब होतात. नखांमध्ये काळ्या रेषा दिसतात. ती पातळ आणि तपकिरी रंगाची होतात.

डोळ्यांभोवती पिवळे डाग : कोलेस्टेरॉल वाढल्यावर डोळ्याभोवती पिवळे डाग पडू लागतात. बॅड कोलेस्टेरॉल खूप वाढलं तर हे डाग नाकापर्यंत पोहोचतात. याला जेंथेप्लाज्मा पलपेब्रारम (XP) म्हणतात.

हात आणि पाय सुजणे : जेव्हा शरीरात बॅड कोलेस्ट्रेरॉल वाढतं, तेव्हा त्याचा परिणाम हात आणि पायांवर दिसू लागतो. हात-पायांमध्ये रक्ताचा पुरवठा कमी होऊ लागतो. त्यामुळे नसांचा रंग बदलू लागतो, आणि त्यामध्ये सूज आणि बधीरपणा येऊ लागतो. यामुळे खूप वेदनाही होतात. हात पायही कमकुवत होऊ लागतात.

त्वचेवर पुरळ येणे: शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चिकट पदार्थ गोठू लागतात. त्यामुळे त्वचेवर पुरळ येते. हे पुरळ शरीराच्या अनेक भागात दिसतात. तुमच्या डोळ्याखाली, पाठीवर, पायवर, तळहातावर गाठी दिसतात.

काळजी कशी घ्याल?

कोलेस्टेरॉल वाढू नये, म्हणून वयाच्या 20 व्या वर्षापासून खाण्यापिणं आरोग्यदायी बनवा, वाईट सवयी सोडा. सिगरेट, अल्कोहोल, प्रोसेस्ड फूड, पिझ्झा बर्गर, पॅकेज केलेल्या गोष्टी इत्यादींचं सेवन खूपच कमी करा. सकस अन्न खा. उदाहरणार्थ, हिरव्या भाज्या, कडधान्य, फळे इत्यादींचं सेवन करा. नियमित व्यायामानं गुड कोलेस्टेरॉल वाढवता येतं. तळलेले पदार्थ,  सिगरेट आणि दारू टाळूनही गुड कोलेस्टेरॉल वाढवता येतं. जर गुड कोलेस्टेरॉल कमी झालं असेल, तर डॉक्टर काही औषधांद्वारे ते वाढवण्याचा सल्लाही देतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने