Holi At Sai Mandir : साईंच्या शिर्डीतही होळीचा उत्साह


विक्रम बनकर, नगर : शिर्डी साईबाबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळीचे पुजन करून होळीचे दहन करण्यात आले.  अपप्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. मध्यान्ह आरती अगोदर होळीची पुजा करून होळी पेटवण्यात आली.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या वतीने श्री गुरुस्‍थान मंदिरासमोर होळी पेटविण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव व त्‍यांची सुविद्य पत्‍नी कावेरी जाधव यांच्‍या हस्‍ते होळीची विधीवत पूजा करण्‍यात आली. याप्रसंगी संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलिप उगले, संजय जोरी, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त उपस्थित होते.

पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने