Icecream : का बनवले जात नाही द्राक्षापासून आईस्क्रीम? जाणून घ्या कारण



ब्युरो टीम : आंबा, स्ट्रॉबेरी आणि अननस यांसारख्या फळांसह चव असलेले आईस्क्रीम तुम्ही खूप खाल्ले असेल, पण द्राक्षाच्या चवीचं आईस्क्रीम का मिळत नाही, याचा कधी विचार केला आहे. जगभर  आईस्क्रीमबाबत इतके प्रयोग होत असताना द्राक्षाच्या चवीचं आइस्क्रीम का मिळत नाही? असा प्रश्न पडतो. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, द्राक्षाचे आईस्क्रीम बनवणे अशक्य आहे असे नाही, पण परफेक्ट आईस्क्रीम बनवणे अवघड आहे. त्यामुळे ते सहसा मिळत नाही.

तज्ञांच्या मते म्हणून बनत नाही द्राक्षाचे आईस्क्रीम :

- द्राक्षांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. द्राक्ष खाल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते, परंतु ही गुणवत्ता आईस्क्रीम बनवण्यासाठी योग्य नाही. जेव्हा तुम्हाला द्राक्षाचे आईस्क्रीम बनवायचे असते, तेव्हा त्यातील पाण्याचा बर्फ तयार होतो. असे बर्फाचे तुकडे असणारे आईस्क्रीम खाण्यामध्ये अनेकांना आनंद मिळत नाही. त्यामुळे ते बनवले जात नाही.

- द्राक्षाचे आईस्क्रीम न बनवण्यामागचे दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे या फळात आढळणारे अॅसिड. जेव्हा ते दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये मिसळले जाते, तेव्हा रासायनिक प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे, जरी तुम्हाला द्राक्षे दुधात किंवा इतर दुग्धजन्य पदार्थात मिसळायची असतील, तर द्राक्षातील अॅसिड अगोदर काढावे लागेल.

- द्राक्षांमध्ये अँथोसायनिन कम्पाउंड आढळते. हे एक पॉवरफुल अँटिऑक्सिडेंट आहे. द्राक्षे गोठल्यावर यामध्ये बदल होतात. आईस्क्रीम मध्ये द्राक्षे वापरल्यास त्याचा रंग आणि चव बदलते. यामुळेच द्राक्षांपासून बनवलेल्या बहुतेक थंड पदार्थ्यांना रंग यावा, यासाठी कृत्रिम रंगांचा वापर केला जातो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने