ब्युरो टीम: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसरी कसोटी इंदूर येथील होळकर स्टेडियमवर सुरू आहे. मात्र, या कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावामध्येही सुमार कामगिरी केली. भारताचा दुसरा डाव फक्त १६३ धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला आता ३ दिवसात विजयासाठी फक्त ७६ धावांची गरज आहे. त्यामुळे या कसोटीमध्ये भारताचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे.
या सामन्यात पहिल्या डावात भारताचा फक्त १०९ धावा करता आल्या होत्या. उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने १९७ धावा करत ८८ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा दुसरा डाव फक्त १६३ धावांत आटोपला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला ३ दिवसात विजयासाठी फक्त ७६ धावांची गरज आहे. पण इंदूर कसोटी आतापर्यंत भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहता भारतीय संघाचा पराभव होणे निश्चित मानले जात आहे. एखादा चमत्काराच भारतीय संघाला या कसोटीत विजय मिळून देऊ शकतो.
दरम्यान, इंदूर कसोटी भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधील अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी महत्त्वाची आहे. या कसोटीत भारताने विजय मिळवला तर त्यांचे वर्ल्ड टेस्ट फायनलमधील स्थान पक्के होईल.
टिप्पणी पोस्ट करा