ब्युरो टीम : उद्या, बुधवारी (22 मार्च) म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम मध्ये चेन्नई येथे होणार वनडे सामना हा भारतासाठी करो या मरो असेल. हा सामना भारताने गमावला तर त्यांच्या हातून मालिका निसटणार आहे. त्यासाठी भारताला या सामन्यात विजयाची गुढी उभारणे महत्वाचे आहे.
भारताचे दुसऱ्या वनडे सामन्यात कामगिरी खूपच खराब झाली होती. भारताला दुसऱ्या सामन्यात फक्त ११७ धावाच करता आल्या होत्या. दुसरीकडे या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ उतरला, पण भारताला यावेळी त्यांची एकही विकेट मिळवता आली नव्हती. त्यामुळे फलंदाजीबरोबरच गोलंदाजीमध्येही भारताला सपशेल अपयश आले होते. त्यामुळे भारताला आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला होता. आता भारताचा उद्या 22 मार्चला तिसरा वनडे सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे.
चेन्नईची खेळपट्टी आणि वातावरण पाहता भारताला फक्त एकच गोष्ट विजय मिळवून देऊ शकते आणि ती गोष्ट म्हणजे फलंदाजी. चेन्नईची खेळपट्टी संथ होत जाणारी आहे. त्यामुळे भारताची जर दुसरी फलंदाजी आली असेल तर त्यांना संयमाने फलंदाजी करावी लागेल आणि आव्हान पूर्ण करावे लागेल. जर भारताची प्रथम फलंदाजी आली तर त्यांना मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीचा संयमाने सामना करावा लागेल. चेन्नईच्या खेळपट्टीवर स्टार्क हा भारतासाठी कर्दनकाळ ठरू शकतो.
टिप्पणी पोस्ट करा