Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाने केली समुद्रात बुडणाऱ्या मासेमारी नौकेतून मच्छिमारांची सुटका



ब्युरो टीम : देशभरात होळीचा सण उत्साहात सुरू असतानाच आरुष या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने समुद्रात बुडत असलेल्या मासेमारी नौकेतून सहा मच्छिमारांची सुटका केली. गुजरात किनार्‍याजवळ अरबी समुद्राजवळ ७ मार्च रोजी ही घटना घडलीय.

गुजरात किनार्‍याजवळ अरबी समुद्रात बुडत असलेल्या मासेमारी नौकेतून, आरुष या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने ७ मार्च रोजी सहा मच्छिमारांची सुटका केली. गुजरात किनाऱ्यापासून ८० किलोमीटर अंतरावर समुद्रात हिमालय ही भारतीय मासेमारी नौका, पाणी नौकेत शिरल्यामुळे बुडू लागली. या संकटाची माहिती देत मदतीची याचना करणारा संदेश पहाटेच्या सुमारास, आयुष या  भारतीय तटरक्षक दलाच्या अरबी समुद्रात तैनात जहाजाला मिळाला. त्यानंतर हे जहाज तातडीने संकटात सापडलेल्या नौकेकडे पोहोचलं आणि सर्वप्रथम, बुडणाऱ्या नौकेतून पाण्याचा निचरा करत नौकेवर कार्यरत खलाशांची सुटका केली.  नंतर तटरक्षक दलाच्या कर्मचार्‍यांनी बुडणारी नौका पूर्ववत करत कार्यान्वितही केली आणि चालक दलाच्या स्वाधीन केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने