Indian Navy : जय हो! भारतीय नौसेनेकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी



ब्युरो टीम : आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतीय नौसेनेकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल, रविवारी घेण्यात आली.  भारतीय नौसेनेकडून ही माहिती देण्यात आली आहे. कलकत्ताच्या घातक युद्धनौकेवरुन ही चाचणी घेण्यात आली. चाचणी दरम्यान या क्षेपणास्त्राने आपल्या टार्गेटवर अचूक हल्ला केला.

नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'भारतीय नौदलाने अरबी समुद्रात डीआरडीओ-निर्मित स्वदेशी साधक आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसह अचूक हल्ला केला आहे. आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक पाऊल आहे. क्षेपणास्त्राची चाचणी कोलकाता श्रेणीच्या गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर युद्धनौकेवरून करण्यात आली. ब्रह्मोस एरोस्पेस क्षेपणास्त्रातील स्वदेशी सामग्री वाढविण्यावर सातत्याने काम करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

https://twitter.com/indiannavy/status/1632356640233254913?t=5_9owqEUFaYUVHK97ZbZkw&s=19

ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे पाणबुडी, जहाज, विमान किंवा जमिनीवरून सोडले जाऊ शकते. ब्रह्मोस हे रशियाच्या P-800 ओशीयन क्रुझ मिसाईल तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय लष्कर, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या तिन्ही दलांकडे सोपवण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने