Job Update : महावितरणमध्ये सुरू झालीय भरती, दहावी पास असाल तर आजच करा अर्ज



ब्युरो टीम : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) येथे भरती करण्यात येत आहे. या जागांबाबतची अधिसूचना कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. महावितरणच्या अधिसूचनेनुसार अप्रेंटिस पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.

अर्ज करण्याच शेवटची तारीख २१ मार्च २०२३ ही असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२३ बाबतच्या अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी कंपनीच्या https://www.mahadiscom.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या. तसेच या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची माहिती जाणून घेऊया.

महावितरणकडून अप्रेंटिस पदांसाठी एकूण ९९ जागांवर भरती केली जाणार आहे.

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)

शाखा – वीजतंत्री

एकूण रिक्त पदे – 99

शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण

अर्ज फी – कोणतेही शुल्क  नाही

अधिक माहितीसाठी https://www.mahadiscom.in/ या अधिकृत बेवसाईटला भेट द्यावी.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने