job:सरकारी नोकरी संदर्भात सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तरुणांना मोठा दिलासा

 


ब्युरो टीम: सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी खूशखबर आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. सरळ सेवेत भरल्या जाणाऱया पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादा दोन वर्षे वाढवून देण्यात आली आहे.यामुळे नोकरभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना महामारीमुळे दोन वर्षे राज्यात सरकारी नोकरभरती झाली नव्हती. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हते. त्या उमेदवारांनी वयोमर्यादा शिथिल करण्याची मागणी केली होती.

 कमाल वयोमर्यादेत दोन वर्षांनी शिथिलता म्हणजेच जर खुल्या प्रवर्गासाठी विहित केलेली कमाल वयोमर्यादा 38 वर्षे असेल तर ती 40 वर्षे ग्राह्य धरली जाईल व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे असेल तर ती 45 वर्षे ग्राह्य धरली जाईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने