Job : मुंबईत येथे मिळेल नोकरी, फक्त टायपिंग येणं आवश्यक

 


ब्युरो टीम: बहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य (Job ) खात्यांतर्गत हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्र तसेच हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.

या भरतीच्या माध्यमातून संगणक सहाय्यक (DEO) पदाच्या रिक्त जागा कंत्राटी तत्वावर भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

संस्था – हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्र तसेच हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

भरले जाणारे पद – संगणक सहाय्यक (DEO)

नोकरी करण्याचे ठिकाण - मुंबई

वय मर्यादा - 45 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - 13 मार्च 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job )

1. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
2. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय ( उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. (Job Notification)

3. उमेदवाराने संगणक वापराबाबतचे MS-CIT (3 महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा ) शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.

4. उमेदवाराने मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे. डेटा एन्ट्रीचा वेग कमीतकमी ८००० की डीप्रेशन्स इतका अवगत असावा. (Job Notification)

5. एम.एस. वर्ड, एक्सेल व मुलभूत सांख्यिकिय तंत्राच्या संगणक प्रणालीची माहिती असावी.

6. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या / शासनाच्या रुग्णालय / कोविड केअर सेंटर मध्ये किमान ६ माहिने काम केलेल्या उमेदवारास अधिक गुण दिले जातील.

मिळणारे वेतन –

संगणक सहाय्यक – Rs. 18,000/- दरमहा

असा करा अर्ज – (Job )

  1. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. पोस्टाने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वारू अर्ज सादर करावे.
  4. अर्ज 13 मार्च 2023 पासून सुरु होतील.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने