kasaba bypoll :प्रचारात पालकमंत्री म्हणाले ‘हू इज धंगेकर?’ निवडणुकीनंतर कॉंग्रेसने फ्लेक्स उभारत दिले उत्तर



ब्युरो टीम: निवडणुकीच्या काळात प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपा उमेदवार हेमंत रासनेंचा एका प्रचार सभेत करताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की 'हू इज धंगेकर?' म्हणत खिल्ली उडवली होती. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेसने पोस्टर  उभारत उत्तर दिले आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमदेवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांची येथेच्छ खिल्ली उडवली होती. त्यांनी धंगेकर कोण आहेत? हु इज धंगेकर? असा सवाल केला होता. धंगेकर यांना ही टीका जिव्हारीही लागली होती. पण त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं नाही. कसब्यातील जनतेने धंगेकर यांच्या बाजूने कौल देताच आता कसब्यात बॅरन वॉर सुरू झालं आहे. या बॅनरमधून चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रश्नावर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. थेट भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयाबाहेरच हे बॅनर्स लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपचे खासदार गिरीश बापटांच्या कार्यालयासमोरचं काँग्रेसने बॅनरबाजी केली आहे. गिरीश बापट यांचं हे मध्यवर्ती कार्यालय कसबा गणपतीसमोर समोर आहे. चंद्रकांत पाटलांनी विचारलेल्या हु इज धंगेकर? या प्रश्नाला धीस इज धंगेकर… असं उत्तर देण्यात आलं आहे. या बॅनर्सवर असा मजकूर लिहून चंद्रकांतदादा यांना जशास तसे उत्तर देण्यात आले असून चंद्रकांतदादांची खिल्लीही उडवण्यात आली आहे. बापटांच्या कार्यालयासमोरचं हा बॅनर लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने