kasaba peth : भाजपने घेतला कसब्याच्या पराभवाचा धसका ? कार्यकारिणी बदलाच्या हालचाली जोरदार.

 


ब्युरो टीम: नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा पेठ विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून पराभव झाल्यानंतर आता भाजपतर्गत कलह सुरु झाला आहे.  भाजपा आता नवीन बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुणे शहर भाजपच्या कार्यकारिणीत मार्च अखेर पर्यंत नवीन बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 दिगवंत भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील जागेसाठी नुकतीच पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत कोन्ग्र्सचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. या मतदार संघात भाजपला तब्बल २८ वर्षानंतर पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे.

कसब्यात झालेल्या पराभवाचा अभ्यास करून लवकरच शहर भाजपमध्ये मोठे बदल होताना दिसणार आहेत. पुणे भाजपचे सद्याचे जिल्हाध्यक्ष जगदीश मुळीक असून हा बदल झाला तर शहराध्यक्ष पदासाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी, गणेश बिडकर, धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची नावे चर्चेत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने