Kasba Peth Assembly : कसबा, चिंचवडचा पहिला कल हाती, वाचा कोण आहे आघाडीवर?



ब्युरो टीम : गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झालीय. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. दोन्ही बाजूचे दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार या मतदारसंघांमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यामुळे आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

कसबा निवडणुकीचा पहिला कल हाती आला असून त्यात २२०० मतांनी महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर पुढे आहेत. तर, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक पहिल्या फेरीअखेर अश्विनी जगताप आघाडीवर आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. एरवी फारसा गाजावाजा न होता नित्यनियमाने निवडणुका पार पडणारा आणि बहुतांशवेळा अपेक्षित निकाल पाहायला मिळणाऱ्या कसब्यातील निवडणूक यंदा मात्र प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.  राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ही पहिलीच चुरशीची म्हणावी अशी विधानसभेची पोटनिवडणूक आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने