Kasba Peth Assembly : कसबा पेठेत भाजपचा विषयच संपला, धंगेकरांची विजयाकडे वाटचाल



ब्युरो टीम : गेल्या २८ वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाला आज सुरुंग लावण्यात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यशस्वी ठरले. कसबा पोटनिवडणुकीत धंगेकर यांची विजयाकडे वाटचाल चालू असून १६ व्या फेरीअखेर त्यांनी ६ हजार ९५७ मतांनी आघाडीवर घेतली आहे. आता मतमोजणीच्या केवळ ४ फेऱ्या बाकी आहेत.

गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झालीय. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. दोन्ही बाजूचे दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार या मतदारसंघांमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यामुळे आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यातही कसबा पेठ मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, गेल्या २८ वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या हा मतदारसंघ खेचून आणण्यात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी यश मिळवले असल्याचे चित्र आहे. 

१६ व्या फेरीअखेर धंगेकरांची विजयाकडे वाटचाल निश्चित झाल्यामुळे धंगेकर व काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरू केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने