Kasba Peth Assembly : कसबा मतदारसंघात इतिहास घडला, काँग्रेसचे धंगेकर विजयी



ब्युरो टीम : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. दरम्यान, गेल्या २८ वर्षांपासून कसबा हा भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, या बालेकिल्लाला काँग्रेसचे धंगेकर यांनी सुरूंग लावत विजय खेचून आणला असून इतिहास घडवला आहे.

भाजपाचा व त्यातही प्रामुख्याने भाजप नेते गिरीश बापट यांचा कसबा हा बालेकिल्ला समजला जातो. हार्ट ऑफ पुणे सिटी असे या मतदारसंघाला म्हंटले जाते. या मतदारसंघात गेल्या २८ वर्षांपासून भाजपचा आमदार होता. गिरीष बापट यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघातून मुक्ता टिळक या आमदार झाल्या होत्या. मात्र, आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. भाजप व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. त्यातच या मतदारसंघात रविंद्र धंगेकर यांनी बाजी मारत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत रविंद्र धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मते पडली, तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मते मिळाली. या मतदारसंघात ११ हजार ४० मतांनी धंगेकर यांचा विजय झाला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने