Madhuri Dixit : आईच्या निधनानंतर माधुरी दीक्षितची भावूक पोस्ट



ब्युरो टीम : सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित (वय ९१) यांचं काल, रविवारी (१२ मार्च २०२३) रोजी मुंबईमधील राहत्या घरी निधन झालं.  माधुरी व तिचे पती श्रीराम नेने यांनी स्नेहलता दीक्षित यांच्या निधनाची माहिती दिली. आईच्या निधनानंतर माधुरीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

स्नेहलता यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत माधुरी म्हणाली, 'आज सकाळी उठले आणि मला आईची खोली रिकामी दिसली. जीवन कसं जगायचं हे तिने आम्हाला शिकवलं. तिने बऱ्याच लोकांना खूप काही दिलं. तिची आम्हाला खूप आठवण येईल. आमच्या आठवणींमध्ये ती कायम असणार. तिची बुद्धी, सकारात्मकता, आशिर्वाद कायमच चांगली उर्जा देणारे होते. तिच्या आठवणींद्वारे आम्ही संपूर्ण आयुष्य जगू, ओम शांती.'

माधुरीच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिच्या आईला कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, रविवारी दुपारी वरळी येथील स्मशानभूमीमध्ये स्नेहलता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने