ब्युरो टीम: सेवागिरी
शिक्षण संस्थेच्या जिजामाता माध्यमिक विद्यालय भोसरी येथील शाळेत महिंद्रा-सीआयई
ऑटोमोटिव लि. व स्किलसोनीकस तर्फे दोन वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या ग्रीन
एज्युकेशन मूव्हमेंट इन स्कूल -GEMS प्रकल्प अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये
प्रकल्प अंतर्गत आरोग्य, सुरक्षा, पर्यावरण या विषयावर आधारित कला आविष्कार
मुलांनी सादर केले. यामध्ये पोस्टर प्रदर्शन, धुम्रपान विषयक पथनाट्य,फर्स्ट एड, पपेट शो,मुलांची प्रकल्प विषयक मनोगते सादर केली.
या कार्यक्रमाच्या
अध्यक्ष सेवागिरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आशाताई कुलकर्णी व प्रमुख पाहुणे
म्हणून महिंद्रा-सीआयई चे दत्तात्रय पडवळ - DGM account, रवींद्र वैद्य -AGM HR & IR, प्रशांत शर्मा -CSR Officer, स्किल सोनिकस चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रसेनजीत
कुंडू, सीवायडीए चे संस्थापक
मॅथ्यू मथम, स्किलसोनिकस चे नॅशनल
हेड श्री योगेश गोरटे, सीवायडीए चे संचालक प्रविण जाधव उपस्थिती होते.
या मान्यवरांनी प्रकल्प विषयक मनोगत व्यक्त केली. व ग्रीन एज्युकेशन मूव्हमेंट इन
स्कूल प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
विद्यालयातील मुलांनी सादर केलेल्या कला आविष्काराचा सन्मान पञ रूपी गुण गौरव
करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मोरे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी जिजामाता शाळेचे सचिव श्री. कुलकर्णी सर, सिक्स सोनिकस चे प्रकल्प समन्वयक किशोर मराठे, योगेश बाविस्कर, जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड सर,
सीवायडीए चे अण्णाबापु हाडोगीकर, स्वाती सिरसाट, सर्व शिक्षक वृंद व शिक्षिका वृंद सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा