MLA Nilesh Lanke : सरकार विरोधात आमदार लंके आक्रमक, कांद्याची होळी करीत केला निषेध



विक्रम बनकर, नगर : महाराष्ट्रात सर्वत्र सध्या कांद्याचा मुद्दा चांगलाच पेटला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. आता या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके धावले असून त्यांनी आज कांद्याची होळी करत शिंदे फडणवीस सरकारचा निषेध केला. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कांद्याचे दर दररोज घसरत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अधिकच आक्रमक झालेत. नगर जिल्ह्यात सुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आंदोलन होत आहे. मात्र आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमदार लंके यांची साथ मिळाली. लंके यांनी होळीच्या सणाच्या दिवशीच थेट कांद्याची होळी करून सरकारचा अनोखा निषेध केला. तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली. कांद्याला सरकारने जर हमीभाव दिला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. राज्यात अनेक आंदोलने झाली. मात्र सरकारला जाग आली नाही,  असा आरोपही यावेळी करण्यात आला.

पहा व्हिडिओ





0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने