MLA Nilesh Lanke : आमदार लंकेंनी का केली कांद्याची होळी? जाणून घ्या



विक्रम बनकर, नगर : आज होळीच्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी कांद्याची होळी करीत राज्य सरकारचा निषेध केला. कांद्याच्या प्रश्नावर राज्यात विविध आंदोलने करूनही सरकारला जाग येत नसल्यामुळे आम्ही आज कांद्याची होळी केली असल्याचे आमदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना लंके यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली.

'शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची पीक कांदा असून या पिकामुळे शेतकरी थोडा समाधानी होत असतो. परंतु यंदा कांदा पिकाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यासमोर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिला नाही,' असे बोलताना लंके पुढे म्हणाले,' मराठी बोली भाषेत म्हणतात की माझ्या कुटुंबाची होळी झाली. होळी झाली याचा अर्थ सर्व काही संपले. कांद्याच्या प्रश्नावर सरकारला आत्तापर्यंत कुठलीही जाग आली नाही. अनेक आंदोलने राज्यात झाली, विधान भवनात हा प्रश्न उपस्थित केला. पण सरकारला जाग आली नाही, म्हणून आज आम्ही कांद्याचीच होळी केली. सरकारला आता तरी जाग यावी, यासाठी सरकारचा अशा पद्धतीने निषेध केला आहे,' असेही लंके यांनी यावेळी सांगितले.

पहा व्हिडीओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने