Mns Gudhi Padva Rally :हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरेंची तोफ धडाडणार



ब्युरो टीम : आज मनसेच्या पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात दिसत आहे. राज ठाकरेंच्या राजकीय टोलेबाजीची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात राजकीय नेतेमंडळींच्या सभांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सर्वात आधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी ५ मार्च रोजी रत्नागिरीच्या खेडमधल्या गोळीबार मैदानावर जाहीर सभा घेतली. त्यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी १९ मार्चला त्याच मैदानावर सभा घेतली. त्यातही त्यांनी उद्धव ठाकरेंवर परखड टीका केल्यानंतर आता आज मनसेच्या पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरेंची आज मुंबईमध्ये सभा होत आहे.

काही दिवसांपूर्वी मनसेकडून या सभेसंदर्भातला टीझर शेअर करण्यात आला होता. या टीझरमध्ये सभेतील राज ठाकरेंच्या भाषणाचे सूतोवाच करण्यात आले होते. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या एका वक्तव्याची व्हिडीओ क्लीप समाविष्ट करण्यात आली असून त्यासोबतच ‘तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा जपण्यासाठी चला शिवतीर्थावर!’ असं आवाहनही करण्यात आलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने