MNS : मज्जा आहे बाबा एका माणसाची... मनसेचा ठाकरे गटाला खोचक टोला



ब्युरो टीम : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल,सोमवारी होळीच्या दिवशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानपदाविषयी केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आलं आहे. या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता या वक्तव्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, मज्जा आहे बाबा एका माणसाची... असे म्हणत ठाकरे गटाला खोचक टोला लगावलाय.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर संदीप देशपांडेंनी खोचक शब्दांत ट्वीट केलं आहे. 'भावी पंतप्रधानांना शुभेच्छा. भंकस वाटली असेल तर माफ करा. पण बुरा ना मानो होली है' असं या ट्वीटमध्ये  देशपांडेंनी म्हटलं आहे. तसेच, 'आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे. तुम्ही आता पंतप्रधान होणार.. मज्जा आहे बाबा एका माणसाची, अशा शब्दांत संदीप देशपांडेंनी टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

उद्धव ठाकरे २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील का? असा प्रश्न संजय राऊतांना पत्रकारांनी विचारला असता त्यावर 'पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहेत. मात्र, २०२४ कोण होईल यापेक्षा विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने