Mumbai Rain : मुंबईत सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस



ब्युरो टीम : मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु झाला आहे. गेल्या काही तासांपासून मुंबई आणि ठाण्यात पाऊस ये-जा करीत आहे. आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि अधुनमधून वीज चमकतनाही दिसत आहे. वाऱ्याचा जोरही जास्त असल्याने पावसाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. त्यातच हवामान खात्याने महत्वाचा इशारा दिला आहे.

मुंबईतील हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्या नुसार  मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पुढील तीन ते चार तास पावसाचा जोर असेल. यावेळी ढगांचा गडगडाट आणि वीजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्याचा जोरही राहील. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात ३० ते ४० KMPH वेगाने वारे वाहतील.

दरम्यान, कामावर जाण्यासाठी आज सकाळी घराबाहेर पडलेल्या चाकरमन्यांची चांगलीच तारांबळ उडताना दिसली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने