Nagaland Assembly Election :शरद पवारांची नागालँडमध्ये जादू, राष्ट्रवादीची सुसाट कामगिरी



ब्युरो टीम : महाराष्ट्रातील चिंचवड विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी राष्ट्रवादीची जादू नागालँडमध्ये चालली आहे.  गेल्या निवडणुकीत केवळ १ टक्का मतदान घेणाऱ्या राष्ट्रवादीनं यंदा नागालँडमध्ये ५ जागा जिंकल्या आहेत. तर दोन जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीची सुसाट कामगिरी सुरू आहे. त्यामुळे नागालँडची निवडणूक राष्ट्रवादीसाठी ऐतिहासिक ठरली आहे. येथे सहा जागांवर राष्ट्रवादीचा मुकाबला थेट भाजपशी झाला. या सहापैकी पाच जागांवर राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला आहे. तर एका जागी त्यांना आघाडी आहे. सत्ताधारी पक्ष असलेल्या एनडीपीपीविरोधातही एका मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर आहे. 

नागालँड येथील राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, अतोअझु विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पिक्टो यांनी ८१०५ मतं घेत मैदान मारलं. त्यांनी अटीतटीच्या लढतीत भाजपच्या सेमा काहुली यांना ४१३ मतांनी पराभूत केलं. लाँगलेंग मतदारसंघात राष्ट्रवादीचे पोंग्शी फोम १६९०८ मतं घेत विजयी झाले. त्यांनी भाजपच्या पांगन्यू फोम यांना धक्का दिला. त्यांना ११६३८ मतं मिळाली. मोन टाऊनमध्ये राष्ट्रवादीच्या मानखाओ कोनयाक यांनी १०८७० मतं घेत भाजपच्या चेओंग कोनयाक यांना धूळ चारली. चेओंग कोनयाक यांनी ८२५९ मतं घेतली. नोकलाक मतदारसंघात राष्ट्रवादीचे पी. लाँगऑन सध्या आघाडीवर आहेत. भाजपचे एच. हेयिंग दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पी. लाँगऑन यांना ८४८२ मतं मिळाली असून हेयिंग यांना ७७४८ मतं मिळाली आहेत. सुरुहुतो मतदारसंघात राष्ट्रवादीचे तोईहो येप्थो यांनी ६९१९ मतं मिळवली. त्यांनी भाजपच्या एच. खेहोव यांचा अवघ्या ६९ मतांनी पराभव केला. तर, टेन्निंग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नामरी नचांग यांनी ६०२६ मतं घेत एनडीपीपीच्या तारीई झेलिआंग यांच्याविरोधात २५४ मतांनी आघाडी घेतली आहे. तसेच वोखा मतदारसंघात राष्ट्रवादीचे म्होनबेमो हुमतसोई यांना १५९४९ मतं मिळाली. त्यांनी भाजपच्या रेन्पोनथुंग इझुंग यांचा ३०६१ मतांनी पराभव केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने