ब्युरो टीम : मनसेचे गुढीपाडव्यात मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण करताना आणि गौप्यस्फोट केलेत. नारायण राणेंनीही पक्ष सोडलाच नसता असंही राज ठाकरे म्हणाले. नारायण राणे शिवसेना सोडून गेले नसते, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. राणेंनी पक्ष सोडून जाऊ नये म्हणून मी त्यांना फोन केला होता, असंही राज ठाकरेंनी सांगताना तो प्रसंग सांगितला.
राज ठाकरे नारायण राणेंबाबत म्हणाले...
'नारायण राणेंनी शिवसेनाच सोडली नसती. मी तुम्हाला तो प्रसंग सांगतो. नारायण राणे पक्ष सोडणार हे कळलं होतं. मी त्यांना फोन केला, मी त्यांना म्हटलं अहो राणे हे काय करताय? शिवसेना सोडू नका. नारायण राणे मला म्हणाले की मला जायचं नाही पण..त्यावर मी त्यांना सांगितलं की बाळासाहेबांशी बोलतो. राणेंचा फोन ठेवल्यावर मी लगेच बाळासाहेबांना फोन केला. त्यांना सांगितलं नारायण राणेंना शिवसेना सोडायची नाही. मला बाळासाहेबांनी लगेच सांगितलं त्याला घेऊन ये. मी नारायण राणेंना फोन केला आणि सांगितलं बाळासाहेबांनी बोलावलं आहे आपण जाऊ ते म्हणाले मी लगेच निघालो. हा फोन झाल्यानंतर पाच मिनिटांनी मला बाळासाहेबांनी फोन केला. मला म्हणाले नारायण राणेंना आणू नकोस, तेव्हा त्यांच्या मागून कुणीतरी बोलत होतं हे माझ्या लक्षात येत होतं. बाळासाहेबांनी फोन करून येऊ नकोस सांगितल्यावर मला राणेंना सांगावं लागलं की येऊ नका.मग सगळ्या पुढच्या गोष्टी घडल्या. लोकांनी बाहेर पडावं यासाठी परिस्थिती निर्माण केली गेली. तेव्हा शिवसेनेत जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा शेवट हा आता असा झाला,'असेही राज ठाकरे म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा