Natya Parishad Election : नाटय़ परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु, प्रशांत दामले-प्रसाद कांबळी आमने सामने

 


ब्युरो टीम: अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची निवडणूक 16 एप्रिल रोजी पार पडणार असून प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी यांचे गट आमनेसामने आहेत. प्रशांत दामले 'रंगकर्मी नाटक समूह'चे आणि प्रसाद कांबळी 'आपलं पॅनेल'चे प्रतिनिधित्व करत आहेत.

काही दिवसांपूर्वी अजित भुरे, प्रशांत दामले यांच्या 'रंगकर्मी नाटक समूह'ने आपले पॅनेल आणि भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर आज प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषद घेऊन 'आपलं पॅनेल'ची उद्दिष्टय़े मांडली. आपलं पॅनेलमध्ये नाटय़क्षेत्रातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व दिले आहे. प्रसाद कांबळी म्हणाले, नाटय़ परिषद बिनविरोध होईल अशा वल्गना काही जण करत होते. आमच्या काही उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घ्यावे, म्हणून फोन करण्यात आले. हे सगळं लोकशाहीला मारक आहे. एकाएकी नाटय़ परिषदेत अनेक जणांना रस निर्माण झालाय. ही सुत्रे कुठून हलवली जात आहेत? अशा बाहेरच्या अदृश्य शक्तींना विरोध करण्यासाठी जागरुक रंगकर्मी म्हणून निवडणूक लढवत आहोत. या वेळी 'आपलं पॅनेल'मधील सर्व उमेदवार उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने