Ncp bjp: नगर पाठोपाठ जळगाव जिल्हा बँकेतही भाजपाचा राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का;



ब्युरो टीम: जिल्हा बॅकेत अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले असतानाही राष्ट्रवादीचे संजय पवार यांनीही आयत्यावेळी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. यानंतर गुप्त पद्धतीनं मतदान झालं. यामध्ये संजय पवार विजयी झाले आहेत. यामुळे नगर पाठोपाठ जळगाव जिल्हा सहकारी बँकेत देखील भाजपने राष्ट्रवादीला बहुमत असतानां देखील धोबीपछाड दिली आहे.

दगडी बँक म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाविकास आघाडी व शिवसेना (शिंदे गट) यांची संयुक्त सत्ता होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा, शिवसेना शिंदे गटाचे पाच, कॉंग्रेसचे तीन, शिवसेना ठाकरे गटाचे दोन, तर भाजपचा एक सदस्य आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शिंदे गटाचे आहेत. तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन भाजपचे आहेत, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडे बँकेचे नेतृत्व आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला दोन वर्ष तर राष्ट्रवादीला तीन वर्ष असा अध्यक्षपदासाठीचा फार्म्युला ठरला होता. प्रत्येकी एक वर्षासाठी राष्ट्रवादीकडून नवीन व्यक्तीला अध्यक्षपद दिले जाईल असा असा निर्णय झाला होता. त्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने अध्यक्ष गुलाबराव देवकर व उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिला होता.

मविआने चंद्रशेखर घुलेंची अध्यक्षपदासाठी नाव निश्चित केल्याने त्यांनी अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्जही भरला. पण अर्ज भरण्याच्या अखेरच्या मिनिटाला भाजपच्या वतीने अचानकपणे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा देखील अर्ज आला. त्यामुळे या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान घेतले. या मतदानामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांना नऊ मते मिळाली. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना दहा मते मिळाली. एक मतदार तटस्थ राहिल्याने या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पण ही संपूर्ण निवडणूक भाजपाकडे वळवण्यात महत्त्वाची भूमिका राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निभावली. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने