Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले...'मी कोणाला लोणी लावणार नाही'



ब्युरो टीम : नागपूरमध्ये वनराई फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. 'लोकांना सांगतो, तुम्हाला पटलं तर मतं द्या. नाहीतर देऊ नका. मी आता फार काही लोणी लावायला तयार नाही. कोणतरी नवीन येईल,' असे म्हणत गडकरींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

वनराई फाऊंडेशनच्या वतीने प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नितीन गडकरींनी  केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

'राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण आहे. तर, राजनीति म्हणजे लोकनीति, धर्मनीति आहे. सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातील उद्दिष्टे आहेत. त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरिबांची सेवा राजकारणातून होणं अपेक्षित आहे,' असेही गडकरी यावेळी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने