Onion : शेतकऱ्यांनी केली कांद्याची होळी



ब्युरो टीम : महाराष्ट्रात सर्वत्र सध्या कांद्याचा मुद्दा चांगलाच पेटला असून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. कांद्याचे दर दररोज घसरत असल्याने कांदा उत्पादक अधिकच आक्रमक झालेत.नाशिक जिल्ह्यात तर शेतकरी खूपच आक्रमक झालेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कांदा मोठ्या प्रमाणात पिकवत असल्यानं सध्याच्या घडीला येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. 

नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने देखील केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आज होळीचा सण साजरा करीत असताना त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नाशिक मधील येवला तालुक्यातील मातुलठाण या गावातील शेतकर्‍यांनी कांद्याची होळी करत संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी कांद्याची होळी करत सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे. कांद्याचे दर वाढवून द्यावे, निर्यात खुली करावी, कांद्याला अनुदान द्यावे अशा प्रकारची मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. 

पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने