pcmc / y4d : अल्फा लावल व वाय फोर डी च्या वतीने पालिका शिक्षकांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न



ब्युरो टीम: पिंपरी चिंचवड महानगर पालिका, अल्फा लावल आणि वाय फोर डी यांच्या संयुक्त विद्यमाने पालिका शिक्षकांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे प्रशस्ती प्रमाणपत्र  वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी अनेक शिक्षकांनी आपली उपस्थिती दर्शवली.

 पिंपरी  चिंचवड महानगर पालिका आणि अल्फा लावल दापोडी व वाय फोर डी  फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील मनपा शाळा जुना ड प्रभाग पिंपरी येथे महानगर पालिकेच्या शिक्षकांना तीन दिवसीय संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

मागील तीन वर्षापासून संगणक प्रशिक्षण कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने पालिकेच्या शिक्षकांसाठी राबविला जात आहे. यामुळे शिक्षकांना संगणक ज्ञान मिळाल्याने विद्यार्थ्य्नाना याचा फायदा होत आहे. या कार्यशाळेत शिक्षकांना एम एस ऑफिस, गुगल अप्लिकेशन , अशे विविध अभ्यासक्रम शिकवले जात आहेत.

यावेळी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, व वाय फोर डी चे संचालक प्रफुल निकम, सह संचालक बिजेश कुमार, कार्यकारी संचालक अरुण घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ सहाय्यक अमोल नामजोशी, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक मेघा खिलारे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक रजत बाठे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक विशाल शेडगे यांनी काम पहिले

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने