Pension: सेवानिवृत्त नगरपालिका शिक्षकांनां पेन्शन वेळेवर देण्याचा प्रयत्न करणार -डॉ.सचिन बांगर



विक्रम बनकर : सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वेळेवर देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व प्रयत्न केले जातील.असे प्रतिपादन राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांनी केले.ते पेन्शनर संघटनेच्या प्रतिनिधींशी बोलत होते.यावेळी प्रशासनाधिकारी भाऊसाहेब थोरात,प्रशासक विकास घटकांबळे, शिक्षण मंडळाचे हेड क्लर्क सय्यद भाऊसाहेब उपस्थित होते.

नगरपालिका शिक्षकांना पी.पी.ओ.देणे, प्रलंबित वरिष्ठ व निवड श्रेणी देणे,शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, इत्यादी समस्यावर समाधानकारक मार्ग काढण्यात आले.

यावेळी अध्यक्ष सत्येंद्र तेलतुंबडे, सचिव के.एन.गायकवाड, महेंद्र पाटील, साहेबराव बोरूडे,क.दा.बोरुडे,सौ.मनिषा शिंदे,सौ.शीला खरात,मेहेरुन्निसा शेख इत्यादी प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला.शेवटी सत्येंद्र तेलतुंबडे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने