PM Modi : काँग्रेसवर कर्नाटकातून पंतप्रधानांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले...



ब्युरो टीम : 'काँग्रेस आणि त्यांचे मित्र मोदींची कबर खोदण्याचं स्वप्न पाहत आहेत. काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात व्यस्त आहे. पण, मोदी बेंगलुरू-म्हैसूर महामार्ग बनवण्यात व्यस्त आहे. तसेच, मोदी गरिबांचं जीवन सुखकर करण्यात व्यस्त आहे,' असा  जोरदार हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे. कर्नाटक राज्यात मांड्यात सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

कर्नाटकमध्ये काही महिन्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी सलग सहाव्यांदा कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी बेंगलुरू-मैसूर या ११८ किलोमीटरच्या महामार्गाचं उद्घाटन केलं.  यावेळी त्यांनी काँग्रेसवर तोफ डागली.

'२०१४ पूर्वीच्या केंद्रातील काँग्रेस सरकारने देशातील गरिबांना उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांचा पैसा लुटला. पण, गेल्या नऊ वर्षात गरिबांसाठी ३ कोटींहून घरे बनवण्यात आली. त्याअंतर्गत कर्नाटकातही लाखो नागरिकांना घरे देण्यात आली. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत कर्नाटकातील ४० लाख कुटुंबांना नळाचे पाणी देण्यात आलं,' अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने