PMC Recruitment : पुणे महापालिकेत नोकरीची मोठी संधी, वाचा कसा कराल अर्ज



ब्युरो टीम : पुणे शहरात राहणाऱ्या तसेच पुणे महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुणे महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.

रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक, पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, कंपाउंडर इत्यादी जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात पालिकेने ६ मार्च २०२३ ला प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत याबाबतची  माहिती जाणून घेऊया.

पदांची नावे 

रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट

वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी

पशुवैद्यकीय अधिकारी

वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक/विभागीय स्वच्छता निरीक्षक

स्वच्छता निरीक्षक

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

कंपाउंडर/औषध निर्माता

वयोमर्यादा 

सर्वसाधारण उमेदवार – किमान १८ आणि कमाल ३८ वर्षे

आरक्षित – ४३, ४५ आणि ५५ वर्षे

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी – १००० रुपये

मागास प्रवर्गासाठी – ९०० रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ मार्च २०२३

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 

उमेदवारांने संबंधित पदांनुसार १० वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं गरजेचं

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

भरतीबाबतच्या अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी महापालिका भरतीसाठीची अधिकृत बेवसाईट

 https://www.pmc.gov.in/recruitment/recruitmentmr.html  ला भेट द्या.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने